सातारा जिल्हा

सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या जिल्हा संघटक पदी नितीन करे

Blog Image

सातारा : सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती ची सहविचार सभा संपन्न झाली.यावेळी जिल्हा कार्यकारणीत फलटण तालुक्यातील युवा नेतृत्व श्री नितीन करे यांना जिल्हा संघटक पदी नियुक्त करण्यात आले. तशी घोषणा जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे यांनी केली.

    महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये अग्रेसर असणारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ही  एकमेव बलाढ्य संघटना आहे. संघटनेच्या बळावर शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवण्यात प्राथमिक शिक्षक समितीला यश आले आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांचा विश्वास संपादन करणारी संघटना म्हणून या संघटनेकडे पाहिले जाते. 

  नितीन करे हे या संघटनेचे प्रामाणिक कार्यकर्ते असल्याने, तसेच त्यांनी फलटण तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे कार्याध्यक्ष म्हणून ही काम पाहिलेले आहे. त्यांना शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असल्याने त्यांना संघटक पदावर नियुक्त करण्यात आले आहे.

  यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते उदय शिंदे, विभागीय उपाध्यक्ष प्रदीप कदम, बँकेचे चेअरमन किरण यादव, जिल्हा सरचिटणीस संतोष मांढरे, कार्याध्यक्ष अनिल पिसाळ, कोषाध्यक्ष मोहन सातपुते, उपाध्यक्ष राजेंद्र पवार यासह जिल्हा कार्यकारणीतली सदस्य उपस्थित होते.

फलटण तालुक्याचे अध्यक्ष संतोष कोळेकर, सरचिटणीस निलेश कर्वे, संचालिका पुष्पलता बोबडे,जिल्हा कार्यकारणी सदस्य राजेंद्रप्रसाद निकाळजे, तानाजीराव वाघमोडे, महिला आघाडी प्रमुख जयश्री कदम, सरचिटणीस शोभा झेंडे, माजी संचालिका सुलभा सस्ते, माजी संचालक सोमनाथ लोखंडे,केंद्रप्रमुख संजय बोबडे

तसेच सर्व तालुक्यांचे तालुका अध्यक्ष सरचिटणीस महिला भगिनी उपस्थित होत्या.