सातारा जिल्हा

ललगुण येथील कृषीदूतांनी दिली चायनीज पिकांच्या शेतीला भेट

Blog Image

ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ कार्यक्रमांतर्गत फलटण एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त कृषी महाविद्यालय फलटण येथील  कृषीदूतांनी ललगुन येथील गडा फार्म यांच्या अंतर्गत चायनीज पिकांचे उत्पादन घेत असलेल्या शेतीला भेट दिली.

कृषीदुतांनी तेथे उपस्थित फार्म च्या सुपरवायजर सौ.अंजली चंदेश पाटले यांच्याकडून तेथील पिकांची माहिती घेतली. सदर शेतीमध्ये विविध प्रकारच्या भाज्या व मसाल्यांचे उत्पादन घेतले जाते. यामधे ब्रोकोली, लाल मुळा, लिफी, सेज, रोजमेरी, ओरिगानो, आइसबर्ग लेटक, चायनीज कॅबेज, रेड कॅबेज, पकचोई, थायन, सिमसन, लीफी, लोलो रोसो, रॉकेट, एलोवेरा, रोमन या सर्व प्रकारच्या पिकांचा समावेश होतो. या सर्व भाज्या व मसाले मुंबई मधे विक्रीसाठी पाठवले जातात. शहरी भागात या सर्व उत्पादनांची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर मजूर कामगारांकडून या पिकांचे उत्पादन घेतले जाते.

कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य श्री. डॉ. यु. डी. चव्हाण सर, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणचे प्राचार्य श्री. डॉ. एस. डी. निंबाळकर सर, समन्वयक प्रा. निलिमा धालपे मॅडम, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित मॅडम  यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत उदयसिंह गायकवाड, सुमित बागुल, ओंकार खेडकर, गौरव रायकर, अमितेश बोदडे, आदित्य घेवारे यांनी या फार्मला भेट दिली.