कोरेगाव : कोरेगाव गावचे सुपुत्र नितीन बोतालजी आर पी आय कोरेगाव तालुका अध्यक्ष यांना आदर्श तालुका अध्यक्ष व भिम योद्धा हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष व सातारा जिल्हा अध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ आणि महाराष्ट्र संघटक कैलास जोगदंड साहेब यांच्या हस्ते देण्यात आला. नितीन बोतालजी यांनी खूप वर्षापासुन कोरेगाव तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर तसेच अण्णा भाऊ साठे, संत गाडगे महाराज या महामानवांचा विचारांचा प्रसार व प्रचार पोहचवण्याचे काम केले, व छोटया मोठया गाव गावातून परिवर्तनाची चळवळ सुरु केली. ही चळवळ तालुक्यातील गावागावांत पोहचली. नितीन बोतालजी यांनी खुप वर्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या सोबत साधा व एक सच्छा कार्यकर्ता म्हणून प्रामाणिक काम केले. नितीन बोतालजी हा मुलगा चळवळ जोमाने चालवेल अश्या विश्वासाने दादासाहेब ओव्हाळ यांनी बोतालजी यांना सर्वप्रथम कोरेगाव शहर कार्याध्यक्ष पद म्हणून नेमणूक केली. त्यानंतर कोरेगाव शहराध्यक्ष व कोरेगाव तालुका अध्यक्ष पद देऊन नियुक्ती केली.बोतालजी यांचे प्रामाणिक समाजकार्य असल्याचे दखल घेत दादासाहेब ओव्हाळ यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने प्रोत्साहन म्हणून नितीन बोतालजी यांना "भिम योद्धा" हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.