कोरेगाव : राष्ट्रवादी जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे माजी अध्यक्ष रमेश उबाळे यांनी बुधवारी पीपल्स रिपलीकन पार्टीमध्ये केला. हा प्रवेश मुंबई येथील पार्टी कार्यालयात झाला यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी स्वागत करून पदाचे नियुक्ती पत्र प्रदान करत रमेश उबाळे यांना पीपल्स रिपब्लिकन पार्टीमध्ये काम करण्याचे पूर्णपणे स्वातंत्र्य देऊ अशी ग्वाही जोगेंद्र कवाडे यांनी दिली. रमेश उबाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आपल्या पदाचा नुकताच राजीनामा दिला होता. त्यामुळे ते पूर्वाश्रमीच्या आ.महेश शिंदे गटात की आंबेडकरवादी गटात जाणार याची चर्चा राजकिय वर्तुळात होती. अखेर त्यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. रमेश उबाळे यांनी यापूर्वी आ. महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये विविध पदावर काम केले आहे. तसेच गेली चार वर्षे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामाजिक न्याय विभागात काम करत होते. रमेश उबाळे यांनी कोरेगाव सातारा खटाव विधानसभा मतदार संघासह जिल्ह्यात अनेक आंदोलन करून आपली स्वतःची शक्ती निर्माण केली आहे यामध्ये साठ वर्षाचा सिद्धार्थनगर येथील पाण्याचा प्रलंबित प्रश्न, भीम नगर रेल्वे यामध्ये गेलेली जमीनीच्या बदल्यात मोबदला मिळाला नव्हता त्यासाठी त्यांनी मोठं आंदोलन करून वेळे प्रसंगी स्वतःच्या जीवाची ही पर्वा केली नाही मागासवर्गीय बांधवांना न्याय मिळवून दिला सिद्धार्थ नगर येथील मागासवर्गीयांना पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना धारेवरती धरून आंदोलनाचा इशारा दिला व पाठपुरावा करून पाण्याचा प्रश्न मार्गी लावला कोरेगावमधून साताऱ्याला जण्यासाठी युवकांना कॉलेजला व परीक्षेला जात असताना एस .टी. उपलब्ध होत नव्हत्या याकरिता मोठे आंदोलन करून त्रिपुटी ते कोरेगाव रस्ता रोको करून चक्काजाम केला व सर्वसामान्य शेतकरी व कष्टकरी पालकांच्या युवकांना न्याय मिळवून दिला मागासवर्गीय समाजाचे वेळोवेळी प्रश्न मार्गी लावले. कोणताही व्यक्ती अडचण प्रश्न घेऊन आल्यास त्याला त्याची जात त्याचा पक्ष विचारत न घेता त्यांचे प्रश्न रमेश उबाळे यांनी मार्गी लावले आपण फक्त आपलं काम सांगा की काम करून द्यायची जबाबदारी माझी तेही कोणाचा साधा चहा सुद्धा न घेता राजकारण समाजकारण करत असताना कायम अर्थकारणाला बाजूला ठेवून फक्त न्याय मिळवून देण्याची भूमिका कायमच रमेश उबाळे यांनी ठेवली आहे. रमेश उबाळे यांनी ल्हासुर्णेची पोल्ट्री हटाव आंदोलन, विद्यार्थ्यांना वेळेवर एस.टी. बस मिळावी म्हणून केलेले चक्का जाम आंदोलन, कोरेगाव नगर पंचयतीविरुद्ध केलेले उपोषण , हंडा मोर्चा आंदोलन सर्वच आंदोलनाची प्रशासकीय पातळीवर चर्चा झाली. सातारा-पंढरपूर, सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या कामात राहिलेल्या त्रुटी, ठेकेदारानी केलेला भ्रष्टाचार त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून रमेश उबाळे यांनी लोकांसमोर आणला. त्यांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन मोठमोठ्या अधिकाऱ्यांन जबाब देण्यासाठी साताऱ्यात जिल्ह्याधिकारी कार्यालयात यावे लागले. रमेश उबाळे यांच्या आंदोलनात मोठी ताकद असल्याची चर्चा कोरेगाव विधानसभा मतदारसंघात तसेच जिल्ह्यात असते. समाजातील तळागाळातील घटकांना मदत, गोरगरीब कुटूंबातील विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य देणे, गरीब कुटुंबातील रुग्णांना आर्थिक सहाय्य करणे, अंध-अपंग लोकांना आर्थिक सहाय्य करणे, यामुळे तमेश उबाळे जणू हा छंद असल्याने या सामाजिक कार्यामुळे उबाळे यांचे नाव समाजतील शेवटच्या घटकापर्यंत पोहचले आहे. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी आपणावर पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात आपण पार्टीची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असून मागासवर्गीय लोकांना न्याय मिळवून देण्यासाठीच आपण निळ्या झेंड्याखाली येऊन काम करण्याचा निर्णय घेतल्याचे रमेश उबाळे यावेळी म्हणाले. यावेळी पार्टीचे सचिव प्रमोद टाले, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नंदकुमार गोंधळी, उपाध्यक्ष मृणाल गोस्वामी, राजाभाऊ चव्हाण, सातारा जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे, बीड जिल्हाध्यक्ष तुडूसुमारे, जालना जिल्हाध्यक्ष राजेंद्र हिवाळे, राज्य सहसंघटक आनंद कडाळे, मुंबई सचिव दिलीप कापसे, राज्य संघटक कपिल लिंगाईत, वाशीमचे अध्यक्ष दौलतभाऊ शिवराळे आदी उपस्थित होते.