सातारा : सातारा शहरातील प्रमुख अशा समर्थ मंदिर ते राजवाडा रस्त्यावर राजधानी टॉवर समोरील कचराकुंडी काही वर्षांपासून हलवली. मात्र परिसरातील नागरिक तेथे दररोज असा कचरा आणून टाकतात. आणि त्यात मग मोकाट जनावरे, गाई हा कचरा संपूर्ण रस्ता भर पसरवतात यावर पालिकेने तातडीने कारवाई करून पुढील पावसाळी काळात आजाराला आमंत्रण देणारा हा प्रकार तातडीने थांबवावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.