सातारा जिल्हा

महाबळेश्वर येथील पर्यटकांना उन्हापासून संरक्षणासाठी चक्क शेडनेटचा निवारा

Blog Image

महाबळेश्वर : सातारा जिल्ह्यातील पर्यटकांचे लाडके पर्यटन स्थळ अर्थात मिनी काश्मीर आणि महाराष्ट्राचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वर येथे पर्यटकांची गर्दी सुट्टी संपत आली तरी वाढतच आहे. दरम्यान उन्हाचा त्रास आणि तडाखा या पर्यटकांना जाणवू नये यासाठी महाबळेश्वरच्या मुख्य डॉ. साबणे रोडवर असे हिरवे शेडनेट अर्थात सावलीसाठी आच्छादन घालून पर्यटकांच्या आनंदाला विरजण लागू नये व उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी नगरपालिका व परिसरातील व्यापाऱ्यांनी काळजी घेतलेली आहे. त्याचे हे बोलके छायाचित्र (फोटो -अतुल देशपांडे सातारा)