सातारा : २१ व्या शतकात खर तर आपल्याला स्वतःच्या आई वडिलांना वाऱ्यावर सोडून देणारे अनेक जण पाहायला मिळतात. मात्र सातारा जिल्हयातील कांदाटी खोऱ्यातील रेनोशी गावातील एका वयस्कर आजी आजोबाना दत्तक घेणारे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. हे पाहून आपणास नक्कीच आश्चर्य वाटेल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण बालपण हे सातारा जिल्हयातील महाबळेश्वर तालुक्यातल्या दरे गावात गेले काही वर्षांपूर्वी या ठिकाणी कोणतेही दळणवळण आरोग्य ची साधन न्हवती मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून काही प्रमाणात हा भाग विकसित होत आहे. याच भागातल्या जंगलातील राहणारे विठ्ठल गोरे आणि धोंडाबाई गोरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील एक वर्षांपूर्वी दत्तक घेतले होते. या दांपत्याची संपूर्ण जबाबदारी त्यांनी स्वीकारलीय मुख्यमंत्री सहकुटुंब गावी आले की आवर्जून या वयस्कर दांपत्याला आपल्या घरी बोलावून घेत असतात आणि त्यांची विचारपूस करत असतात. मुख्यमंत्र्यांनी काल देखील मुंबईला जाताना या दाम्पत्याला घरी बोलावून पावसाळा सुरू होण्यापूर्वी पावसाळ्यात पुरेल इतकं संसार उपयोगी साहित्य किराणा दिला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी लता शिंदे यादेखील उपस्थित होत्या. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे यांचे देखील या दांपत्याकडे विशेष लक्ष आहे. दरे गावात असणाऱ्या सर्व नातेवाईकांना आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी या कुटुंबाला काहीही कमी पडू देऊ नका अशा सूचना केल्या आहेत. वृध्द दाम्पत्याला आपल्या कुटुंबाची उणीव भासू न देणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांना हे वयस्कर दाम्पत्य भरभरून आशिर्वाद देत आहे.