सातारा जिल्हा

डेंग्युपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी स्वतः पदाधिकारी व नगरसेवक उतरले रस्त्यावर; कोरेगावात प्रभाग

उपक्रमाचे होत आहे सर्वत्र स्वागत
Blog Image

कोरेगाव : कोरेगाव शहरामध्ये उन्हाच्या प्रादुर्भावामुळे डासांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव वाढला आहे.  डेंग्युचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत चालले आहे. डेंग्युला आळा घालण्यासाठी कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे व नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. शनिवारी सायंकाळी सात वाजल्यापासून त्यांनी प्रभाग क्रमांक सात व आठमध्ये स्वखर्चाने फॉग मशीनद्वारे औषध फवारणीस सुरुवात केली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

प्रभाग क्रमांक सात व आठमध्ये प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे व नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे यांनी नेहमीच सर्वसामान्य नागरिकांची काळजी घेण्यास पुढाकार घेतला आहे. कोरोना काळापासून विविध साथींच्या रोगाच्या काळात देखील त्यांनी स्वखर्चाने आरोग्यविषयक जनजागृती मोहीम व मोफत आवश्यक उपचाराचे उपक्रम हाती घेतले होते. सद्यस्थितीत कोरेगाव शहरात डेंग्युचे रुग्ण वाढत चालले असून डासांना आळा घालण्यासाठी त्यांनी स्वखर्चाने फॉग मशीनद्वारे औषध फवारणीस सुरुवात केली आहे. शांतीनगर परिसरातील रहिमतपूर रस्ता लागतच्या परिसरात शनिवारी सायंकाळपासून औषध फवारणीस सुरुवात करण्यात आली. रामलिंग रस्ता, बुरुड गल्ली, सीताबाई तळे, चौथाई, श्री भैरवनाथ मंदिर परिसर, व्यापार पेठ, जानाई मंदिर परिसर, सम्राट गल्ली, माळी गल्ली व सम्राट गणेशोत्सव मंडळ परिसरासह दोन्ही प्रभागातील

प्रत्येक घरात आणि परिसरात औषध फवारणी केली जात आहे. कोणत्याही परिस्थितीत डासांचे निर्मूलन करून डेंग्युचा प्रादुर्भाव कमी करण्याचा आशावाद राजाभाऊ बर्गे व राहुल बर्गे यांनी व्यक्त केला. डेंग्यु सदृश्य लक्षणे दिसून आल्यास तात्काळ नागरिकांनी संपर्क करावा. डेंग्यु तपासणीसह त्यांच्या औषधोपचारासाठी विशेष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही राजाभाऊ बर्गे व राहुल रघुनाथ बर्गे यांनी दिली.

प्रभागातील नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी कटिबद्ध

कोरेगाव शहरामध्ये प्रचंड प्रमाणात पसरलेल्या डेंग्युवर  उपाय योजना करण्यासाठी आज स्वतः रस्त्यावर उतरून प्रभाग क्रमांक सात व आठ मध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्राथमिक उपाय म्हणून फॉगमशीनद्वारे स्वखर्चाने औषध फवारणी करण्यात आली. प्रभागातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहिले पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती राजाभाऊ बर्गे आणि  राहुल बर्गे यांनी दिली.