सातारा जिल्हा

आरपीआय मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार : नितीन बोतालजी

मनुस्मृतीचे शिक्षण पाठ्यपुस्तकात न घेण्याची मागणी
Blog Image

कोरेगाव : राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार एस सी ए आर टी ने नुकतच ३ री ते १२ वीचा अभ्यासक्रमाचा आराखडा जाहीर केला. त्यामध्ये मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा अध्याय पाठ करायला हवा अशी शिफारस केली गेली. त्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि या शिफारसीचा पुनश्च विचार करावा, नाहीतर येणाऱ्या काळात  शिक्षण मंत्री व मुख्यमंत्री यांना काळे झेंडे दाखवणार असा इशारा कोरेगाव तालुका रिपब्लिकन पक्षातर्फे नितीन बोतालजी यांनी दिला.

शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचे श्लोक शिकवले जाणार, म्हणजेच लहान पणापासूनच विद्यार्थ्यांच्या मध्ये जातीभेदाची बीजे रुजवण्याचे काम सरकार करणार आहे. त्यामुळेच एस टी इ आर टी ने जाहीर करीत असलेला अभ्यासक्रम हा अत्यंत क्लेशदायक व महाराष्ट्राला आराजगतेकडे नेणारा आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये एकमेकांच्या मध्ये जातीय भावना उत्पन्न होऊन द्वेष भावनेची निर्माण होणार आहे. उच्च-नीचतेची दुबळी भावना या माध्यमातून पाहण्यात येणार आहे. अशा अभ्यासक्रमामूळे मनूच्या चातुवर्णव्यवस्थेला खतपाणी घालण्याचा हा प्रकार आहे. हा प्रकार पुरोगामी चळवळीतील लोक खपवून घेणार नाहीत. त्याचमुळे या अशा अभ्यासक्रम  पुस्तकांची होळी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात येईल. असा अभ्यासक्रम त्वरित बंद करावा अन्यथा येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर तीव्र स्वरूपाचे एल्गार आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे कोरेगाव तालुक्याचे अध्यक्ष नितीन बोतालजी यांनी निवेदनाद्वारे शासनास दिला.यावेळी नितीन बोतालजी, पंकज जावळे, ऋतुराज वायदंडे, दीपक खरात,शिरीष आवळे, शौकत कुरेशी, मयूर बनसोडे, सुप्रिया येवले, मनीषा सोनवणे, स्मिता जगताप, वनिता खवळे, संजना पोतदार आदी उपस्थित होते.