सातारा : मास सोशल फाउंडेशनचा प्रथम वर्धापन दिन श्री.म्हाळसाकांत विद्यालय पाल ता.कराड येथे उत्साही वातावरणात संपन्न झाला. फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. महेंद्र अवघडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त वित्त व लेखा अधिकारी तानाजी वायदंडे, प्राचार्य राजेंद्र भिंगारदेवे, सुरेश भिसे उपस्थित होते.
यावेळी फाउंडेशनने सातारा जिल्ह्यात राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती संस्थेचे खजिनदार गणेश लोखंडे यांनी प्रास्ताविकातून दिली. विनायक चव्हाण यांनी संस्था ही उच्च शिक्षण असो नोकरी, व्यवसाय यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मदत करत असून समाजातील अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना श्री. तानाजी वायदंडे म्हणाले,मागासवर्गीय समाजातील जाणकार लोकांनी समाजाच्या हितासाठी स्थापन केलेले मास सोशल फाउंडेशन हे निश्चितपणे चांगले काम करत असून तरुणांना स्फूर्ती देण्याचे काम करत आहे.
फाउंडेशनचे अध्यक्ष महेंद्र अवघडे म्हणाले, वंचित, शोषित घटकात शिक्षण आणि प्रबोधनाद्वारे योग्य परिवर्तन घडवायचे आहे. त्यासाठी फाउंडेशनतर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. पुढील वर्षापासून "आदर्श माता पिता" पुरस्कार देणार असल्याचे जाहीर केले. तसेच विद्यार्थ्यासाठी करीअर मार्गदर्शन व व्यवसाय मार्गदर्शन केले जाणार आहे.
यावेळी क्रांतीस्मृती अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र भिंगारदेवे, सुरेश भिसे, विजय दणाने, लालासो साठे, विजय दणाने, तातोबा भिसे, माधवी चव्हाण, गणेश बोतालजी, आनंदा भिंगारदेवे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी संजय चव्हाण, हणमंत बागाव, नंदकुमार तुपे, पोपट खिलारे, दत्ताजी साठे, अनिल तुपे, पोपट खिलारे, माधव साठे, पोपट आवळे, अनिल कांबळे, चंद्रकांत तडाखे, किशोर फाळके, वसंत अवघडे, सुरेश बाबर, भरत कांबळे, लक्ष्मण सुतार, आबा साठे, राजेंद्र साठे, हणमंत अवघडे यासह जिल्ह्यातील मास फाउंडेशनचे सदस्य विशेषतः महिलावर्गाची मोठ्या संख्येने उपस्थित होती. सूत्रसंचालन राहुल साठे व विक्रम माने यांनी केले तर आभार श्रीमंत मोरे यांनी मानले. एकंदरीत पालीच्या पवित्र भूमीत सातारा जिल्ह्यातील मातंग समाजातील बुद्धिवादी वर्ग एकत्र येऊन समाजासाठी तन, मन, धनाने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.