महाराष्ट्र

"इये निबंधांचिये नगरी" या पुस्तकाचे पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते प्रकाशन

प्रा. नागेश कदम यांना "महाराष्ट्र शैक्षणिक सेवारत्न पुरस्कार" मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला
Blog Image

मालवण : मराठी साहित्यात निबंधलेखन करणे, हे फार मोठे कौशल्य आहे. निबंधलेखनासाठी वाचन, चिंतन, मनन व नियमबध्द लेखन आवश्यक असते. प्रा. नागेश कदम यांनी "इये निबंधांचिये नगरी" या निबंधलेखन संग्रहात खूप मेहनत घेतली आहे. त्यांचे निबंध वाचनाने आजचे विद्यार्थी निबंध स्पर्धेत, वक्तृत्त्व स्पर्धेत व स्पर्धा परीक्षेत यश मिळवू शकतात, म्हणून सदरचे पुस्तक सर्वांनी वाचावे, असे प्रतिपादन पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग व किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्र, तसेच समृध्दी प्रकाशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने बहुभाषिक साहित्य संमेलन येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे संपन्न झाले. या संमेलनामध्ये प्रा. नागेश कदम यांच्या 'इये निबंधांचिये नगरी' या निबंधलेखन पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच प्रा. नागेश कदम यांना "महाराष्ट्र शैक्षणिक सेवारत्न पुरस्कार' आयोजकांच्या वतीने, मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी व्यासपिठावर प्रसि‌द्ध आर्किटेक्चर, निलिया गुप्ता, डॉ. दिपक परब, जेष्ठ साहित्यिक डॉ. अ.ना.रसनकुटे, डॉ. राजश्री खटावकर, कॉ. अच्युत सोमवंशी, दिग्दर्शक संजय मोहिते, सुप्रसिद्ध गझलकार अजय नाईक, समृद्धी प्रकाशनचे संचालक डॉ. बी. एन. खरात आदी मान्यवर उपस्थित होते.