सातारा : साताऱ्यातील आमदार शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनी थेट त्यांना त्यांच्या कार्यालयाची पाटी भेट दिली आहे. त्यात शिंदे यांचा उल्लेख खासदार म्हणून केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पार्टीला 100 टक्के खात्री आहे की शशिकांत शिंदे खासदार होतील. ग्रेनाइट वर सोनेरी अक्षरात लिहलेल्या "खासदार शशिकांत शिंदे" यांचा हा फोटो सातारा जिल्हयात सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला असून अनेकांनी त्यांच्या स्टेटसवर पण ठेवला आहे.