सातारा : सातारा शहरातील जिल्हा परिषदेच्या सर्वात मोठ्या अशा मैदानावर विविध प्रकारची प्रदर्शने तसेच करमणुकीचे स्टॉल लावले जातात. विविध प्रकारचे उत्सव, प्रदर्शने आणि स्टॉल झाले वर या मैदानाची परिस्थिती अक्षरशः केविलवाणी असते. या ठिकाणी दररोज खेळण्यासाठी तसेच व्यायामासाठी, चालण्यासाठी येणाऱ्या निसर्गप्रेमी नागरिकांना मात्र या अशा घाणीच्या प्रकाराला सामोरे जावे लागते. नुकतेच या मैदानात एक प्रदर्शन पार पाडले मात्र त्याचा कचरा व घाण आजही तेथे दिसून येत आहे. याबद्दल जिल्हा परिषद प्रशासन तातडीने कारवाई का करत नाही? असाच प्रश्न खेळाडूंना आणि व्यायाम प्रेमींना पडत आहे.