सातारा : सातारा शहर म्हणजे ऐतिहासिक शाहू नगरी, अजिंक्यतारा किल्ल्याची पार्श्वभूमी लाभलेल्या अशा या ऐतिहासिक शाहूनगरीमध्ये शिवतीर्थ हा प्रत्येक सातारकरांचा मानबिंदू आणि अभिमान असणारी अशीच जागा. या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या भोवतीची संरक्षक भिंत आता सध्या ऐतिहासिक काळ्या दगडांच्या कोरीव कामातून भक्कम तटबंदी आणि संरक्षक भिंतीचा नजारा देताना एखाद्या ऐतिहासिक किल्ल्याप्रमाणे भासत आहे. परिसरात असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती परिसर तसेच पोस्टाची इमारत आणि परिसरातही या बाजूच्या सर्व भिंतींना तसाच ऐतिहासिक धाटणीचा रुप देण्याचा प्रयत्न सुरू असून त्याचे काम वेगाने सुरू आहे. विविध बाजूंनी दिसणारी ही शिवतीर्थाची अभिमानास्पद जागा आपल्या कॅमेऱ्यात टिपली आहे पत्रकार अतुल देशपांडे सातारा यांनी.