सातारा जिल्हा

जावली तालुक्यातील आसणी गावामध्ये बिबट्याचा वावर; ग्रामस्थ भयभित

वनविभागाने बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी
Blog Image

मेढा : जावली तालुक्यातील आसणी गावामध्ये गत चार दिवसापासून बिबट्याचा वावर असून आत्तापर्यंत गावातील अनेक कुत्र्यांचा त्याने फाडशा पाडला असल्याने गावातील तसेच परिसरातील ग्रामस्थ भयभित झाले आहेत. वनविभागाने या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. या विभागातील अनेक जण महाबळेश्वर येथे नोकरी निमित्ताने जात - येत असून रात्री उशिराने घरी येत असतात. अशा वेळी बिबट्याच्या वावरण्याने जिव मुठीत घेवून लोकांना घरी यावे लागत आहे. आसणी गावातुन अनेक कुत्र्यांचा फडशा बिबट्याने केला असून कुत्र्यांचा सापडासुप झाल्यानंतर शिकारीची चटक लागलेला बिबट्या जनावरांची, माणसांची शिकार करू शकतो. लोकांच्या मनात भितीचे वातारण असून वन विभागाने या बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करू लागले आहेत.