सातारा जिल्हा

राजाभाऊ बर्गे मित्र समूहातर्फे कोरेगावात सर्वरोग तपासणी आणि मोफत आरोग्य उपचार शिबिराचे आयोजन

सुमारे दहा हजार रुपयांच्या चाचण्या तपासणी होणार मोफत
Blog Image

कोरेगाव : कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. महेश शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि कोविडयोद्धा डॉ. अरुणा विजय बर्गे व डॉ. प्रियाताई महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत ऊर्फ राजाभाऊ बर्गे मित्र समूहातर्फे सोमवार दि. २७ मे रोजी सकाळी ९ वाजता कोरेगाव येथील सम्राट गणेश मंडळ अंगणवाडी इमारतीमध्ये सर्वरोग तपासणी आणि मोफत आरोग्य उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल बर्गे व प्रशांत ऊर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या माध्यमातून क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय सातारा आणि कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग तपासणी आणि मोफत आरोग्य उपचार शिबिराचे आयोजन केले आहे. नगरसेवक राहुल बर्गे, नगरसेविका संजीवनी बर्गे, सम्राट गणेश मंडळ आणि सम्राट महिला मंडळाच्या सदस्या या शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहेत.

दहा हजार रुपयांच्या चाचण्या होणार मोफत

सुमारे दहा हजार रुपये खर्च येऊ शकणाऱ्या हिमोग्लोबीन तपासणी, किडनी संदर्भातील तपासणी, लिव्हर तपासणी, रक्तातील साखर तपासणी, कोलेस्ट्रोल तपासणी, कॅलशियम तपासणी, काविळ तपासणी, थायरॉईड तपासणी, पांढर्या पेशी तपासणी, शरिरातील रक्ताचे प्रमाण आदी तपासणी या शिबिरामध्ये मोफत केल्या जाणार आहेत. कोरेगाव शहरातील नागरिक, महिला व युवक-युवतींनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी केले आहे.