सातारा जिल्हा

सातारा शहरात तोतापुरी आंब्याची आवक

Blog Image

सातारा : हापुस पायरीचा स्वाद चाखल्यानंतर आता सातारकरांसाठी तोतापुरी आंब्याची मोठी आवक झाल्याचे दिसून येत आहे. सातारा शहरातील राजवाडा परिसरात हे तोतापुरी आंबे आता नगावर विक्री होत आहेत. 20 रुपयापासून चाळीस रुपये पर्यंत प्रति नग हे आंबे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. तब्बल जुलै महिना अखेरीपर्यंत हे आंबे आता सातारकरांना चाखता येणार आहेत. (फोटो - अतुल देशपांडे, सातारा)