देश-विदेश

छ. शाहू अकॅडमीचा १२ वीचा निकाल ९९.७१ टक्के

Blog Image

सातारा : विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित छ. शाहू अकॅडमी अँड सायन्स जुनियर कॉलेजचा इयत्ता १२ वीचा निकाल ९९.७१ टक्के लागला असून कॉलेजने उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. 

इयत्ता १२ वीचा बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून अकॅडमीच्या निरन मोहित भंताड याने ९५.६७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. त्याला गणित आणि जीवशास्त्र या विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळाले. राही श्रीनिवास पाकले हिने ८६.६७ टक्के गुण मिळवून द्वितीय तर, तनिष्का श्रीकांत महामुनी हिने ८४.५० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले, प्राचार्य सौ. डिंपल जाधव, सर्व शिक्षक, कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.