सातारा : मुंबईतील घाटकोपर येथील झालेल्या होर्डिंग दुर्घटनेमुळे अनेकांना जीव गमवावे लागले. त्यामुळे अनधिकृत होर्डींगचा विषय ऐरणीवर आला आहे. पुणे-सातारा महामार्गावर आनेवाडी टोलनाका येथे नुकतेच 100 ते 150 फूट उंचीचे चार ते पाच होर्डिंग कोसळले आहेत. कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याने होणारी मोठी दुर्घटना टळली. परंतु अनधिकृत होर्डिंग्जजी संख्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत होर्डिंग्जचे ऑडिट व्हावे व अनधिकृत होर्डिंग्जना चाप बसावा. याबाबत सातारा जिल्हा प्रशासनाने योग्य निर्णय घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे.