सातारा : मे महिन्याच्या पहिल्यांदा भाव खाऊन गेलेला कोकणातील हापूस आंबा आता दरात खाली आला आहे. सातारा शहरात कोल्हापूर मार्केट मधून मोठ्या प्रमाणात या हापूस आंब्याची आवक झाल्यामुळे तसेच मद्रास आणि कर्नाटक भागातूनही मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची आवक झाल्यामुळे कोकण हापूसचा दर खाली आला आहे. रुपये 300 ते 500 प्रति डझन दराने हा आंबा साताऱ्यात नागरिकांना खाण्यासाठी उपलब्ध झाला असून त्याची आवकही मोठ्या प्रमाणात आहे ,असे आंबा विक्रेते श्री .बेंद्रे यांनी सांगितले (फोटो ..अतुल देशपांडे ,सातारा)