सातारा जिल्हा

जी.डी.सी.ॲण्ड ए परीक्षा दि. 24 पासून

Blog Image

सातारा (जिमाका) : शासकीय सहकार खाते अंतर्गत जी.डी.सी.ॲण्ड ए व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन पदविका परीक्षा माहे मे 2024 ही परीक्षा दिनांक 24,25, व 26 मे 2024 रोजी सकाळी 10.00 ते 1.00 व दुपारी 2.00 ते 5.00 यावेळेत आण्णासाहेब कल्याणी विद्यालय,कॅम्प, सातारा व धनंजय गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा, या दोन परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. ज्या परीक्षार्थींनी प्रवेशपत्र मिळालेले नाही त्या परीक्षार्थींनी परीक्षेपूर्वी 1 दिवस अगोदर म्हणजेच दिनांक 23 मे 2024 रोजी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा, नवीन प्रशासकीय इमारत, हजेरी माळ, सदर बझार, एस.टी.स्टँडच्या मागे सातारा, या कार्यालयात संपर्क साधावा. परीक्षा प्रवेशपत्र मिळण्यासाठी परीक्षार्थींनी ओळखी दाखल पुरावा म्हणून आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र किंवा पॅन कार्ड इत्यादी व आयकार्ड साईज दोन फोटो घेऊन यावेत, सदर परीक्षार्थींनी याची कृपया नोंद घ्यावी असे आवाहन जी.डी.सी ॲण्ड परीक्षा केंद्र ,१२  तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था केंद्र प्रमुख मनोहर माळी  यांनी केले आहे.