सातारा जिल्हा

विविध मतदान जनजागृती स्पर्धांचे कोरेगाव येथे निकाल जाहीर

Blog Image
कोरेगाव : सातारालोकसभा निवडणूक अंतर्गत कोरेगाव विधानसभा मतदारसंघातर्फे मतदान जनजागृतीसाठी अनेक उपक्रम राबवण्यात आले. याचाच एक भाग म्हणून विविध खुल्या स्पर्धा घेण्यात आल्या .त्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती स्वीप अर्थात मतदान जनजागृती पथकाद्वारे देण्यात आली. मतदानाचा टक्का वाढावा म्हणून अनेक उपक्रम तसेच अनेक कार्यक्रम, व्याख्याने, स्पर्धा आयोजित केल्या गेल्या .काव्य लेखन ,निबंधलेखन, रांगोळी स्पर्धा कुटुंब फोटो स्पर्धा अशा स्पर्धा जाहीर करण्यात आल्या होत्या. काव्यलेखन, निबंध आणि रांगोळी स्पर्धेसाठी "मतदानाचे लोकशाहीतील महत्त्व" हा विषय देण्यात आला होता. तर फोटो स्पर्धेसाठी "माझे कुटुंब जबाबदार मतदार" असा विषय देण्यात आला होता. काव्यलेखन स्पर्धेमध्ये दशरथ जाधव ,संतोष राऊत आणि योगिता मापारी विजेते ठरले. तर निबंध स्पर्धेमध्ये डी सी राऊत, जितेंद्र चौधरी, सोनाली भोसले यांनी पारितोषिके पटकावली आहेत. रांगोळी स्पर्धेमध्ये रेखा कसबे आणि नंदिनी जमदाडे यांनी पारितोषिके मिळविली . तर फोटो स्पर्धेमध्ये स्वप्नील साबळे आणि आश्विनी साबळे यांनी पारितोषिक प्राप्त केले आहे. या सर्व स्पर्धांचे पारितोषिक वितरण लवकरच होणार आहे. या स्पर्धा खुल्या होत्या तसेच  कोणतीही प्रवेश फी नव्हती.या सर्व स्पर्धांसाठी मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी देण्यात आली होती. त्यासाठी सोशल मीडिया आणि वर्तमानपत्रांचे मोलाचे सहकार्य मिळाले, अशी कृतज्ञता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली.

वाशिम जिल्ह्याचे विशेष कौतुक

विशेष म्हणजे वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर येथील जिल्हा परिषद हायस्कूल मधून सात विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी आवर्जून निबंध पाठवले. तसेच कवितादेखील पाठवल्या. त्यांच्याविषयी विशेष कृतज्ञता व्यक्त करण्यात आली .तसेच या सर्वांना कुरियरद्वारे पुस्तके, प्रभाकर सामान्यज्ञान दिनदर्शिका आणि कृतज्ञतापत्र असे पारितोषिक रवाना करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली.