सातारा : शाहू नगरीचे जनक आणि स्वराज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मभूमी ते कर्मभूमी जन्मोत्सव पालखीचे साताऱ्यामध्ये शिवतीर्थ येथे शनिवारी सायंकाळी उत्साहात स्वागत करण्यात आले. येथील शिवतीर्थावर आयोजित छोटेखानी कार्यक्रमात येसूबाई फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास राजे शिर्के, हिंदू नृपती छत्रपती थोरले शाहू महाराज पालखी सोहळा समितीचे संस्थापक प्रमोद भोसले, महाड येथील समन्वय समितीचे अध्यक्ष भरत मोरे, सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख इत्यादी मान्यवर पोवई नाक्यावर उपस्थित होते. छत्रपती शाहू महाराजांच्या पालखीचे मान्यवरांनी दर्शन घेऊन त्याला अभिवादन केले. शाहू महाराज पालखी सोहळ्याचे यंदा तिसरे वर्ष होते.
शुक्रवार दिनांक 17 रोजी गांगवली जिल्हा रत्नागिरी येथून छत्रपती थोरले शाहू महाराज पालखी सोहळा समिती सदस्यांच्या उपस्थितीत पालखीला अभिवादन करून तेथून मार्गक्रमणेला सुरुवात झाली. यावेळी येथील आमदार भरत शेठ गोगावले यांनी शाहू महाराजांच्या स्मारकासाठी 50 लाख रुपये निधी मंजूर झाल्याची घोषणा केली आणि लवकरच स्मारकाचे काम सुरू होईल असे आश्वासन दिले. तत्पूर्वी शाहू महाराजांच्या जन्म काळाचे पाळणागीत म्हणण्यात आले. गांगवली, माणगाव, महाड ,महाबळेश्वर, मेढा आणि तेथून सातारा असा प्रवास करून पालखीचा लवाजमा सायंकाळी साडेसात वाजता येथील पोवई नाक्यावर दाखल झाला .मेढा महाबळेश्वर मार्गावर पाऊस झाल्याने पालखी सोहळा उशिरा रात्री आठ वाजता साताऱ्यात आला .या पालखीचे पारंपारिक पध्दतीने स्वागत करण्यात आले . यावेळी सातारा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अभिजीत यादव, उपनिरीक्षक एस पी जाधव पोलीस हवालदार एच के जाधव तसेच धीरेंद्र राजपुरोहित, अजय जाधवराव, सुरेश राजेशिर्के , दिलीप गायकवाड, लीलाधर राजे भोसले, इं मान्यवर उपस्थित होते .पोवई नाक्यावर मान्यवरांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा समिती सदस्यांनी घोषणा दिल्या.
या सोहळ्याला पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी शुभेच्छा दिल्या . त्यांच्या वतीने बोलताना सहाय्यक निरिक्षक अभिजीत यादव म्हणाले, सातारा ही एक ऐतिहासिक मराठ्यांची राजधानी आहे . छत्रपती शाहू महाराज यांचे शाहू नगरीच्या जडणघडणीमध्ये मोठे योगदान आहे . अशा ऐतिहासिक परंपरा त्याची जपणूक करणे आणि हा वारसा पुढच्या पिढीला सुपूर्त करणे हे हे काम निष्ठेने व परंपरेने व्हायला हवे त्या दृष्टीने शाहू महाराज थोरले पालखी सोहळा समिती व येसुबाई फाउंडेशन सदैव सक्रिय आहेत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडेच आहेत या सर्व समिती सदस्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी यादव यांनी शुभेच्छा दिल्या . यावेळी साताऱ्याची एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करणारी बारा वर्षीय धैर्या विनोद कुलकर्णी हिचा यादव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . तर येसूबाई फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी धैर्या कुलकणी हिचे विशेष अभिनंदन केले . एव्हरेस्ट सर करणाऱ्या साताऱ्याच्या प्रियांका मोहिते हिच्यानंतर धैर्याने सुध्दा भारतातील सप्तशिखरे पादाक्रांत करावीत तिच्या मेहनतीला व इच्छाशक्तीला माझ्या शुभेच्छा आहेत असे ते म्हणाले . पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष प्रमोद भोसले व भरत मोरे यांच्यासह सर्व मान्यवरांचे स्वागत येसूबाई फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास राजे शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले.