सातारा जिल्हा

प्राथमिक शिक्षक बँक नेहमीच शिक्षकांच्या आर्थिक प्रगतीसाठी आघाडीवर : चेअरमन किरण यादव

प्राथमिक शिक्षक सहकारी बँक कोरेगाव शाखेमार्फत वाहन वितरण संपन्न
Blog Image

कोरेगाव - सभासदांना नेहमी आपल्या जवळची वाटत असणारी शिक्षक सहकारी बँक नेहमीच शिक्षकांच्या आर्थिक प्रगती साठी आघाडीवर असून सभासदांचा विश्वास जपणूक करण्यास पात्र ठरली आहे असे प्रतिपादन प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे चेअरमन किरण यादव यांनी केले.

      प्राथमिक शिक्षक सहकारी बँक कोरेगाव शाखेमार्फत कोरेगाव तालुका शिक्षक समितीचे जेष्ठ कार्यकर्ते श्री विजयराव शिंदे शाळा कवडेवाडी यांना नवीन हुंडाई ची क्रेटा गाडीचे वितरण आणि पूजन प्रसंगी ते बोलत होते.

    यावेळी कोरेगाव शाखा संचालक श्री नितीन शिर्के, जेष्ठ नेते श्री प्रदीप कदम ,कोरेगाव तालुका शिक्षक समिती अध्यक्ष श्री किरणजी फाळके श्री . मुकुंद जगताप श्री विजय अडसूळ श्री गणेश जी लोखंडे श्री चंद्रकांत सुर्यवंशी श्री उदय घोरपडे श्री अमिर आतार श्री जहॉगीर हकीम पृथ्वीराज निकम,जितेंद्र जाधव चंद्रकांत सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते

        या वेळी उपस्थित मान्यवर,सर्व शिक्षक वर्ग  आणि कोरेगाव शाखाप्रमुख श्री नितीन शेडगे व सर्व स्टाफ बँकेमार्फत चावी देण्यात आली.उपस्थित सर्वांचे आभार शाखाप्रमुख यांनी मानले.