सातारा- समस्त गोडोलीकर आणि येथील सामाजिक कार्यकर्ते रवी पवार गेली २५ वर्ष माझ्या वाढदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करतात. छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास सुरु असून कडक उपवास असतानाही रवी पवार यांनी रक्तदान केले. या रौप्यमहोत्सवी रक्तदान शिबिरात ८७ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. गोडोलीकरांचा हा सामाजिक उपक्रम इतिहास घडवेल, असे गौरवोद्गार आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढून सर्व रक्तदात्यांचे त्यांनी आभार मानले.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या वाढदिनी गोडोली येथे रवी पवार यांच्या पुढाकारातून कर्तव्य सोशल ग्रुप, युवा मोरया सामाजिक संस्था आणि गोळीबार मैदान व गोडोली मित्रसमूह यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे हे २५ वे वर्ष असून रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा सत्कार आणि त्यांना प्रमाणपत्रांचे वाटप आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी रवी पवार, शेखर मोरे- पाटील, व्यंकटराव मोरे, फिरोज पठाण, सुवर्णा पाटील, आनंदराव कणसे, बाळासाहेब खंदारे, अमोल मोहिते, अविनाश कदम, शरद काटकर, पूनम निकम, रुपाली घाडगे, मालती साळुंखे, रोहित खुस्पे, मोहित खुस्पे, अभि सुर्वे, अविनाश माने, सागर भोसले, हेमलता किरवे, आप्पा पिसाळ, सुनील मोरे, पोपट मोरे, चेतन जाधव, शहाजी जाधव, कांचन करांडे, रवी अहिरे, अक्षय मोरे, गौरव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
रक्तदान शिबिरात ८७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रवी पवार यांनी सलग ५२ व्या वेळी रक्तदानाचे कर्तव्य बजवाले. या सर्वांचे आ. शिवेंद्रसिंहराजेंनी कौतुक करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. गोडोलीकरांच्या या उपक्रमाला दरवर्षी रक्तदाते चांगला प्रतिसाद देत असतात. शिबिराच्या यशस्वीतेसाठी रवी पवार आणि त्यांचे सर्व सहकारी अविरत परिश्रम घेत असतात. माझ्या वाढदिनी हा सामाजिक उपक्रम घेऊन गोडलीकरांनी एक आदर्श निर्माण केला असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.