सातारा : सातारा जिल्हा परिषदेतंर्गत कर्मचा-यांच्या सन 2025 च्या सर्वसाधारण बदल्या दि. 20 मे 2025 ते दि. 23 मे 2025 अखेर होणार आहेत. यापुर्वी प्रशासकीय बदल्या झालेल्या कर्मचा-यांना वरिष्ठ अधिकारी मर्जीतील कर्मचारी यांना पुन्हा प्रतिनियुक्तीने जिल्हा परिषदेमध्ये ठेवण्यात आले आहे. ह्या वर्षी प्रशासकीय अथवा विनंती बदल्या केलेल्या कर्मचा-यांना तात्काळ कार्यमुक्त करुन त्यांना त्यांचे नियुक्तीच्या ठिकाणी हजर होणेबाबत आदेश व्हावेत, बदली होऊनही मर्जीतील कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्ती देण्यास विरोध आहे असे निवेदन राष्ट्रवादीचे जावली तालुका अध्यक्ष साधु चिकणे यांनी जिल्हा परिषद प्रशासनास निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हंटले आहे, याबाबत यापुर्वी उपरोक्त प्रकार झाल्याचे निदर्शनास आले आहेत अशाप्रकारच्या अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. उपरोक्त प्रमाणे यावर्षी असा प्रकार निदर्शनास आल्यास राष्ट्रवादी पक्षामार्फत जि.प. समोर आंदोलन करणेत येईल, जेणेकरुन सर्व कर्मचा-यांना समान न्याय मिळावा, हे पक्षाचे धोरण आहे.