सोलापूर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयडल्स बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे सोलापूरमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन राष्ट्रीय जंगम समाज संघटनेचे अध्यक्ष श्रावणभैय्या जंगम यांनी केले. आयडल्स बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक कुणालभैय्या बाबरे यांची यावेळी उपस्थिती होती. यंदाच्या वर्षी मंडळाचे अध्यक्ष म्हणून श्रीशैल हिरेमठ शेरा यांच्या नेतृत्वात भव्य दिव्य स्वरूपात मिरवणूक संपन्न झाली. तब्बल दीड दिवस उत्सव मिरवणूकित असंख्य कार्यकर्ते सर्व समाजाचे बांधव या ठिकाणी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राष्ट्रीय जंगम समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रावणभैय्या जंगम म्हणाले, यंदाच्या वर्षी 82 मंडळांनी सहभाग घेतलेला अशा उत्सवाचं व पूजेचं मान मला मिळाल्याबद्दल मी सर्वांचा मनःपूर्वक ऋणी आहे. या वेळेला सोलापूर जिल्हा राष्ट्रीय जंगम समाज संघटनेचे युवा समन्वयक श्री. मल्लिकार्जुन हिरेमठ, श्री. कुणाल बाबरे, श्री. श्रीशैल हिरेमठ उपस्थित होते. या वेळेला मंडळाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थितीत होते.