सातारा जिल्हा

काश्मिरच्या पहलगाममध्ये झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा कोरेगावात भाजपच्यावतीने निषेध

पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी प्रांताधिकारी कार्यालय परिसर दुमदुमला
Blog Image

कोरेगाव : जगातील प्रति स्वित्झलँड समजल्या जात असलेल्या काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करत ३० पेक्षा अधिक निरपराध भारतीय नागरिकांनी हत्या केली आहे. भाजपने या हल्ल्याचा स्पष्ट शब्दात निषेध केला असून, कोरेगावात प्रांताधिकारी कार्यालयासमोर पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. भारताने थेट पाकिस्तानवर हल्ला करुन काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला घ्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली. 

भाजपच्या जिल्हा कोअर कमिटीच्या सदस्या डॉ. सौ. प्रियाताई महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी साडेअकरा वाजता प्रांताधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निषेध आंदोलन करण्यात आले. भाजपचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघप्रमुख भरत मुळे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल प्रकाश बर्गे, तालुकाध्यक्ष निलेश यादव, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, माजी नगरसेवक सचिनभैय्या बर्गे, उपनगराध्यक्ष राहूल रघुनाथ बर्गे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काटकर, माजी नगरसेवक रशीद शेख, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य दीपक कांबळे, भाजयुमोचे शहराध्यक्ष दीपक फाळके, अमोल माने, जवानसिंग घोरपडे, किसनराव सावंत, राजेंद्र घाडगे, सुमित देंडे, गौरव खवळे, बाबा दुबळे, संतोष नलावडे, शहाजी फडतरे, अर्जुन आवटे, पोपटराव भिलारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. 

डॉ. सौ. प्रियाताई शिंदे यांनी काश्मीरमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता पाकिस्तानवर थेट हल्ला करण्याची वेळ आली आहे. दहशतवादी सर्वसामान्य भारतीय नागरिकांना लक्ष्य करुन भ्याड हल्ला करत आहेत. भारताने याबाबत कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी भरत मुळे, राहूल प्रकाश बर्गे, निलेश यादव यांनी आंदोलनामागील भूमिका विषद केली. 

प्रारंभी प्रांताधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी करत पाकिस्तानचा निषेध करण्यात आला. त्यानंतर प्रांताधिकारी अभिजित नाईक यांना निवेदन सादर करुन आमच्या भावना राज्य आणि केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्याची मागणी करण्यात आली. 

या आंदोलनामध्ये प्रशांत संकपाळ, धनवान कदम, रमेश आप्पा माने, काकासाहेब घोरपडे, महादेव घोरपडे, देवदत्त निकम, संतोष चव्हाण, रतन काटकर, प्रवीण शिंदे, शुभम माने, सुरज मोरे, राजेश जाधव, विनेश साळुंखे, सचिन चतुर, तानाजी गोळे, संदीप फाळके यांच्यासह यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते  आंदोलनात सहभागी झाले होते.