सातारा जिल्हा

वहागांव मध्ये अदानी कंपनीच्या प्रिपेड मिटरला तीव्र विरोध

मिटर मुळे भविष्यात वीज ग्राहकांना भरमसाठ दर वाढीसाठी सामोरे जावे लागणार असल्याबाबत निवेदन
Blog Image

कराड : महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाने ग्राहकांची बिघडलेली मिटर दुरुस्त करून न देता नवीन प्रिपेड मिटर देण्यास सुरुवात केली आहे. परंतु या मिटर मुळे भविष्यात वीज ग्राहकांना भरमसाठ दर वाढीसाठी सामोरे जावे लागणार आहे. राज्य सरकारने अदानी कंपनीला नवीन प्रिपेड मिटर बसाविण्याचे टेंडर दिले आहे. ज्यामुळे भविष्यात वीज बिलाचे पैसे ऍडव्हान्स मध्ये कंपनीला भरावे लागणार आहेत. वहागांव मध्ये मिटर बसवायला आलेल्या अदानी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना गावकर्यांनी रोखले असुन त्या संबंधीचे निवेदन शाखा अभियंता स्वप्नजा गोंदिले यांना देण्यात आले. सरकार हळूहळू सर्व शासकीय मंडळांचे खाजगीकरण करत आहे. ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईला सामोरे जावे लागत आहे. यामुळे एक दिवस जनतेतून तीव्र उठाव होऊ शकतो असे जाणकारांनी मत व्यक्त केले आहे. वहागांवचे आदर्श सरपंच संग्राम पवार बाबा, ग्रामपंचायत सदस्य धनंजय पवार, माजी उपसरपंच सचिन पवार , तळबीडचे चंद्रसेन मोहिते , युवा कार्यकर्ते तानाजी पवार , राहुल पवार , पंकज पवार गणेश पवार अक्षय ताटे संजय चव्हाण राजेंद्र पवार वैभव पवार निलेश पाटील संभाजी पवार आदी उपस्थित होते.