सातारा : सातारा तहसील कार्यालय आवारातील संबंधीत स्टॅम्प वेंडर लायसन्स धारक स्टॅम्प विक्री न करता सर्वसामान्य नागरीकांची पिळवणुक करीत आहेत. याबाबतचे निवेदन शिवबा संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सविताताई शिंदे व बहुजन समाज पार्टीचे सातारा विधानसभा अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी मुद्रांक जिल्हाधिकारी संजय पाटील यांना दिले आहे. निवेदन अर्जात पुढे म्हंटले आहे, स्टॅम्प वेंडर लायसन्स धारक स्टॅम्प विक्री न करता सर्वसामान्य नागरीकांची पिळवणुक करीत आहेत. जर लायसन्स धारक स्टॅम्प विक्री करणार नसतील तर त्यांचे लायसन्स तात्काळ रद्द करण्यात यावे. तसेच तहसील कार्यालय परिसरात बसण्यास त्यांना मज्जाव करण्यात यावा. सदर विषयाची गांभीर्याने दखल न घेतल्यास आपल्या कार्यालयात लोकशाही मार्गाने उपोषणास बसण्याचा ईशारा देण्यात आला आहे. सदर निवेदनात स्टॅम्प विक्री न करणाऱ्या स्टॅम्प वेंडर यांचा नामोल्लेख केला आहे.