कोरेगाव : सातारा जिल्ह्यातील सत्तेच्या राजकारणामध्ये भक्कम पर्याय निर्माण झाल्याचे चित्र महायुतीच्या करिश्माने दिसले आहे. कोरेगाव मतदार संघात शिवसेनेचे आ. महेश दादा शिंदे यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. या दोन्ही वेळेला श्री रमेश उबाळे यांची साथ निर्णायक ठरली आहे. अर्थात हे सर्वांचे श्रेय असून आ महेशदादा शिंदे यांची ४५ हजार ६३ मताधिक्याची वाटचाल ही भविष्यातील परिवर्तनवादी व दलित चळवळीसाठी दिशादर्शक ठरली आहे. कोरेगाव विधानसभा मतदार संघामध्ये महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यामध्ये दुरंगी लढत झाली. इतर उमेदवारांना फारसा प्रभाव टाकता आला नाही. याचे कारण म्हणजे महाविकास आघाडीकडे झुकणारा समाज विशेषतः दलित व इतर मागासवर्गीय आणि मराठा अल्पसंख्यांक मतदार यांनी राजकीय स्थिरता याला प्राधान्य दिले आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आलेला आहे. याचा प्रचार केला असला तरी सुद्धा कोरेगाव मतदार संघामध्ये आमदार महेश शिंदे यांचे पारडे जड होते .आज ते अधोरेखित झालेले आहे. दलित, पद- दलित, इतर मागासवर्गीय, कष्टकरी, शेतमजूर, शेतकरी यांच्यासाठी नेहमीच लढा देणारी तरुण युवा नेते रमेश अनिल उबाळे यांनी शिंदे गटातून शिंदे गटाकडे प्रवेश केला. त्यापूर्वीचे आ महेश शिंदे यांचे कट्टर समर्थक होते. मध्यंतरीच्या काळामध्ये पुलाखाली बरेच पाणी वाहून गेले. परंतु, त्यांचा राजकीय परतीचा प्रवास हा यशस्वी ठरलेला आहे. युवा नेते रमेश अनिल उबाळे यांनी या निवडणुकीमध्ये प्रचार करताना प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी पायाला भिंगरी आणि जाहीर सभेतून सडेतोड प्रश्न व उत्तर देण्याचा सपाटा लावला होता. त्यामुळे खऱ्या अर्थाने मागासवर्गीय, दलित, अल्पसंख्यांक, इतर मागासवर्गीय व मराठा समाजातील जोडली गेलेली साखळी अभ्येद्द राहिली. हे या विजयाने स्पष्ट झालेले आहे. पूर्वी भाजप हा जातीयवादी पक्ष असे जे राळ काँग्रेसने उठवली होती. तीच राळ आता भाजपा काँग्रेसवर उलटली आहे. २८८ आमदारांची संख्या पाहता सर्व जाती धर्माला प्रतिनिधित्व देणारा महायुती आणि घराणेशाही व प्रस्थापितांची तळे उचलणारी काँग्रेस अशी उभी फूट पडल्याचे दिसून आलेले आहे. सातारा जिल्ह्यामधील कोरेगाव मतदारसंघांमध्ये सातारा, कोरेगाव, खटाव या तीन तालुक्यातील मतदारांनी मताधिक्य देऊन आमदार महेश शिंदे यांच्या विकास कामासोबतच सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाण्याच्या भूमिकेला वाढता पाठिंबा दिलेला आहे. आमचे नेते आदरणीय जोगेंद्र कवाडे सर आदरणीय जयदीप कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात खूप मोठी क्रांती घडलेली आहे. आज खेड्यापाड्यातील दलित, अल्पसंख्याक, मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय आणि मराठा समाजामध्ये एक नवचैतन्य निर्माण झालेले आहे .अर्थात ईव्हीएम मशीनच्या घोटाळा हा आरोप आता जुना झाला असून या आरोपीला उत्तर देण्याची आता त्याचे गांभीर्य राहिलेले नाही. असे श्री रमेश उबाळेंनी स्पष्ट केले. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा असाच पॅटर्न राहून सर्व जाती धर्माला न्याय मिळेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाने सातारा जिल्ह्यात भरघोस पाठिंबा दिला असल्याने जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे विशाल भोसले व अन्य सहकाऱ्यांच्या योगदानाने हा विजय झाल्याचे महायुती कधी विसरणार नाही असेही त्यांनी विश्वास व्यक्त केला.
घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या अधिकाराने सुज्ञ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. त्या संविधानाला कोणीही आता वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करणार नाही .असे श्री उबाळे यांनी अधोरेखित केले. आमदार महेश शिंदे हे संविधान प्रेमी असून त्यांच्या विजयाने संविधानाची तत्व व मूल्य अधिक घट्ट झालेली आहेत. असे श्री राहुल बर्गे व निलेश नलावडे यांनी छातीठोकपणाने सांगितले. साताऱ्यात महायुतीचा करिष्मा झालेला आहे. भाजपचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले राष्ट्रवादीचे आ. मकरंद पाटील आणि शिवसेनेचे आ महेश शिंदे या तिघांना जर लाल दिवा मिळाला तर खऱ्या अर्थाने महायुती साताऱ्यात दिसून येईल. यासाठी या तिघांनाही मंत्री करण्याची मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश उबाळे यांनी केले आहे.