कोरेगाव : निवडणूक आली की खोटा प्रचार, बदनामी, फेक नरेटिव्ह व जातीय, धार्मिक मुद्दे नेहमीच प्रचाराच्या केंद्रबिंदू असतात असे दिसते. परंतू "विकास" हा मुद्दा गौण राहत असतो. परंतु कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढली जात आहे, असे एकंदरीत पहायला मिळते. कोणत्या पक्षाने पाच वर्षात मतदारसंघाचा सर्वाधिक विकास केला? यांवरच ही निवडणूक पार पाडली जात आहे. तसे पाहिले तर, वेगवेगळे मुद्दे उकरून प्रचाराला उत आला आहे. पण कोरेगाव- खटाव- सातारा मतदारसंघातील जनतेने यावेळी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक हाती घेतल्याचे दिसते. "मतदारसंघाचा विकास करणारा आमदार आम्हाला हवा आहे." अशी साद जनतेतून ऐकू येऊ लागली आहे.