राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यानंतर आ. शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे महाविकास आघाडी तसेच आमचे दैवत आदरणीय पवार साहेब, उद्धव ठाकरे ,बाळासाहेब थोरात यांनी लढणाऱ्या कार्यकर्त्याला पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो.
महाविकास आघाडीची रणनीती ही सर्वसामान्य लोकांसाठी घातक आहे या प्रश्नाला उत्तर देताना शशिकांत शिंदे म्हणाले जर महाविकास आघाडीचे रणनीती ही धोकेदायक असती तर लोकसभेला एवढा मोठा बदल पाहिला मिळाला नसता. महाराष्ट्रातली सत्ता हातातून जाते असं दिसून आल्यानंतर वेगवेगळ्या योजना घेऊन सरकारची तिजोरी खाली करून या मतदार राजाला आकर्षित केला जातोय हेच खरं नाटक आहे. राज्याच्या प्रत्येक माणसावर कर्जाचा डोंगर करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करायचा हे दुर्दैवाने आता आम्हाला पाहायला मिळते. महाविकास आघाडीच्या माध्यमातून जातिवाद पसरवला जातोय या प्रश्नाला उत्तर देताना हेच उमेदवार निगेटिव्ह निरेटिव्ह आहेत ज्या माणसाकडे वैचारिक पातळी नाही. त्या माणसावर न बोललेलं बरं. सत्ता मिळाल्यानंतर सामान्य लोकांच्या नरडीवर पाय देऊन जो राजकारण करतो तो फार काळ टिकत नाही. कोरेगाव येथील जनतेला दडपशाहीला सामोरे जावे लागत आहे. लोकांचा खास करून तरुणांचा जनशोक आता त्यांच्या विरोधात जायला लागलेला असल्यामुळे ते घाबरले आहेत. त्यांना माहिती आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागणार आहे. असं पत्रकारांच्या प्रश्न उत्तर देताना त्यांनी सांगितले.
या सरकारने धनगर आरक्षणाचा जीआर 15 दिवसात मागे घेतला तो मतदानासाठी काढला होता का ? तीन पक्षाचे तीन नेते वेगवेगळे स्टेटमेंट देऊन समाजामध्ये दरी निर्माण करत आहेत. जनता सुद्ज्ञ आहे त्यांना यावेळी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं वक्तव्य कोरेगाव येथे शशिकांत शिंदे यांनी केलं.