कोरेगाव : खास खवय्यांसाठी भारतातील नंबर १ ब्रँड "नादब्रम्हा इडली" या नवीन व्यवसायाचा शुभारंभ ना. महेश शिंदे यांच्या शुभहस्ते आज दि. २ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता संपन्न होणार असल्याची माहिती "नादब्रम्हा इडली" चे संचालक दिलीप वलीयावीटील यांनी दिली. श्रीकृष्ण बेकरी समोर, जुना मोटार स्टॅंड, कोरेगाव याठिकाणी या नवीन व्यवसायाचा शुभारंभ होत आहे. अलीकडील काळात मोठ्या प्रमाणावर जंक फुड चा आहारात समावेश झाल्याने शारीरिक व्याधी निर्माण होऊ लागल्या आहेत. परंतु आहारात इडली या हलक्या व सहज पचणाऱ्या पदार्थाचा समावेश झाला तर बऱ्याच शारीरिक व्याधी दूर होऊ शकतात व भूकही भागू शकते. उद्या होणाऱ्या या उदघाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून सातारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुलदादा बर्गे, प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, सुनील खत्री, नगराध्यक्षा दिपाली बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल बर्गे, संजय पिसाळ, राजेंद्र सिंग, अनिल बोधे, सी. आर. बर्गे(तात्या), उदय देशमुख, डॉ. वरदराज काबरा व चारुदत्त निदान यांची उपस्थिती असणार आहे. उद्या सायंकाळी ४ ते ६ या वेळेत खवय्यांसाठी फ्री इडली वाटप करण्यात येणार आहे. तरी या नवीन व्यवसायाच्या शुभारंभ प्रसंगीं कोरेगाव शहरातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन "नादब्रम्हा इडली" चे संचालक दिलीप वलीयावीटील यांनी केले आहे.