सातारा जिल्हा

गौंडवाडीत किसान दिन जल्लोषात साजरा

Blog Image

इस्लामपूर : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न भारती विद्यापीठाचे लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय कडेगांव येथील कृषी कन्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव आणि औद्योगिक जोड प्रकल्प अंतर्गत राष्ट्रीय किसान दिन साजरा केला.

          या प्रसंगी जिल्हा परिषद येथील विद्यार्थी तसेच शिक्षक यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमा दरम्यान कृषीकन्या निकिता सानप,सानिका शेळके, श्रावणी शिंदे ,धनश्री वायदंडे, शंतमी पाटील  यांनी बीज प्रक्रिया  प्रात्यक्षिक करून या विषयी गावकऱ्यांना मार्गदर्शन  केले. या वेळी  शाळेतील शिक्षिका उत्कर्षा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कृषी सहाय्यक थोरात मॅडम यांचेही सहकार्य लाभले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहन चव्हाण  ग्रामपंचायत सदस्य शोभा कुंभार ,संदीप जाधव ,सुनंदा चव्हाण, तुषार चव्हाण व गावकरी उपस्थित होते.