सातारा : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य सहसमन्वयक पदी "सह्याद्री वेध" चे संपादक गणेश बोतालजी यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी जाहीर केली आहे. सातारा येथील हॉटेल महेंद्र एक्झिक्युटीव्ह येथे आयोजित केलेल्या संघटनेच्या कार्यक्रमात राज्य उपाध्यक्ष सतीशभाऊ सावंत व राज्य संघटक तेजस राऊत यांच्या हस्ते गणेश बोतालजी यांचा निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. व निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी संजय कदम, विकास भोसले, सचिन भिलारे, संतोष शिराळे, संदीप माने व मिलिंद लोहार यांची प्रमुख उपस्थिती होती.
गणेश बोतालजी यांनी सातारा जिल्हाध्यक्ष पदाची यशस्वी कारकीर्द पार पाडल्याबद्दल संघटनेचे अध्यक्ष राजा माने व सतीशभाऊ सावंत यांनी राज्य पातळीवर महत्वाचे पद देऊन गणेश बोतालजी यांना काम करण्याची संधी दिली आहे.
यावेळी गणेश बोतालजी म्हणाले, संघटनेने माझ्यावर सोपविलेली ही नवीन जबाबबदारी मी यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. सातारा जिल्हाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात सातारा जिल्ह्यातील संघटनेच्या सर्व पत्रकारांनी मला ताकदीने पाठिंबा देऊन काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून सर्वांचा आभारी आहे. राजा माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपली संघटना अधिकाधिक वाढविणे व बळकट करणे यावर मी विशेष कार्य करणार आहे. यावेळी सोमनाथ साखरे, राहिद सय्यद, नवनाथ पवार, प्रशांत बाजी, युवराज धुमाळ, महेश नलावडे व संघटनेच्या पत्रकार बांधवांची उपस्थिती बहुसंख्येने होती.