सातारा जिल्हा

दि. २२ सप्टेंबर २०२४ रोजी होणार साजरा शिक्षक बँकेचा शतक महोत्सव कार्यक्रम : चेअरमन किरण यादव

Blog Image

सातारा : दि. २१/१०/१९२४ रोजी स्थापन झालेली प्राथमिक शिक्षक बँक आज १०० वर्षे पूर्ण करत आहे. या “बँकेचा शतक महोत्सवी समारंभ" रविवार दिनांक २२/०९/२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह जिल्हा परिषद सातारा येथे साजरा होणार असून या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे साहेब उपस्थित राहणार असून हा सोहळा मा. पद्मविभूषण खा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. अशी प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन किरण यादव यांनी दिली.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. ना. श्री. शंभूराज देसाई मंत्री राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सातारा व ठाणे जिल्हा, मा.ना. श्री. महेशजी शिंदे उपाध्यक्ष महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे, मा. ना. नरेंद्र पाटील अध्यक्ष अण्णासाहेव पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, मा. खा. श्री. छत्रपती उदयनराजे भोसले सदस्य लोकसभा, मा. खा. श्री. धैर्यशील मोहिते पाटील सदस्य लोकसभा, मा. खा. श्री. नितीन पाटील सदस्य राज्यसभा तसेच प्रमुख उपस्थित मध्ये मा. आ. श्री. पृथ्वीराज चव्हाण, मा. आ. श्री. रामराजे नाईक निंबाळकर, मा. आ. श्री. शशिकांत शिंदे, मा. आ. श्री. बाळासाहेव पाटील, मा. आ. श्री. शिवेंद्रसिंह राजे भोसले, मा. आ. श्री. मकरंद पाटील, मा. आ. श्री. जयकुमार गोरे, मा. आ. श्री. दिपक चव्हाण, मा. आ. श्री. अरूण लाड, मा. आ. श्री. जयंत आसगावकर, मा. श्री. अनिल देसाई अध्यक्ष सातारा जिल्हा नागरी सह. बँक असो. उपस्थित राहणार असून या कार्यक्रमानिमित्त बँकेच्या १०० वर्षाच्या कार्याचा आढावा घेणारी "शतार्थ" या स्मरणिकेचे प्रकाशन व ए टी एम कार्ड चे वितरण तसेच अकरा ज्येष्ठ सभासदांचा सन्मान मान्यवरांच्या शुभहस्ते होणार आहे. त्याच बरोबर बँकेचे माजी चेअरमन यांचाही सन्मान मान्यवरांच्या शुभहस्ते होणार आहे. तरी सर्व सभासद, ठेवीदार हितचिंतक यांनी या कार्यक्रमास अगत्यपूर्वक उपस्थित रहावे असे आवाहन बँकेचे चेअरमन मा. किरण यादव, व्हा. चेअरमन मा. शहाजी खाडे व सर्व संचालक सदस्य व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. छगन खाडे यांनी केले आहे.