दहिवडी : पिंपरी ता.माण येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सौ.लक्ष्मी भगवान बुधावले यांची निवड करण्यात आली. दादा महादेव राजगे यांनी राजीनामा दिल्याने ही निवड करण्यात आली. दरम्यान ९ सदस्य असलेल्या पिंपरी ग्रामपंचायतीमध्ये श्री.दादा राजगे या सदस्याला आमदार जयकुमार गोरे गटाने जिल्हाधिकारी यांच्याकडे तीन अपत्याबाबत आक्षेप घेतल्याने अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे चार - चार बलाबल झाल्याने ही निवड चिट्टीद्वारे करण्यात आली. राष्ट्रवादीच्या लक्ष्मी भगवान बुधावले व विरोधी गटाच्या सौ.मंगल उत्तम माने या दोघींनी अर्ज भरले.सुजाता राजगे,राणी अवघडे,गुलाब राजगे व लक्ष्मी बुधावले यांनी बुधावले यांच्या बाजूने मतदान केले.समान बलाबल झाल्याने चिट्टी टाकण्यात आली. त्यामुळे चिट्टीद्वारे लक्ष्मी बुधावले यांनी विजयी घोषित करण्यात आले. या निवडीबद्दल राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, माजी सभापती नितीन राजगे,अण्णा राजगे, धनाजी राजगे,शंकर अवघडे,आप्पा राजगे,डॉ.दिलीप राजगे,डॉ.लाला राजगे,राघू बुधावले,दादा हिरप्पा राजगे, निवास शिलवंत,कांता तरंगे, आनंदा राजगे,विश्र्वंबर गायकवाड प्रकाश माने,महादेव अवघडे,संजय शिलवंत, अकाराम राजगे आदींनी अभिनंदन केले आहे.